🎆फायनल दीवाळी
सातवीला केंद्राही फायनल परीक्षा अहे
फायनल पास जाल्यावर हायस्कुलला जाव्याहे
हांगव्याहे कारण की मी होतो फायनल्ला
तवापासुन मीन बहिस्कृत मायापुरता केलं दीवाळीला
त्यालाव कारण हेजारसा बिनफायनल जगुदादास
त्याला पांढरेसुब्र इस्त्री कपडे घालव्या घणा सोस
कपडे ईस्त्रीहाटी सिसणपर्यंत मायी तंगडतोड
मोबदला झिरो न जग्गू हिरो त्याला नय तोड
मंग फायनलस्या वहरा आक्रित घडुन आलं
ऐन दिवाळीत जग्गूनं मला लांड्रीत धाडलं
एक पेटता फटाका आंगलट आला गाठोड पेटलं
वचपा म्हणून जग्गून हुकतघातलेल लुगड जाळलं
करुनसरुन जग्गून मायावरस बालंट आणलं
दीवाळीहे धम्मक लाडू पाठीवर धपाटलं
अह एकंदरीत फायनल ठरली माही दिवाळी
रवोळी तहोळी गेली जिवायी जाली होळी.
.........हेमन वरोरियन.
No comments:
Post a Comment