✍झिण्याबाबाहा वाडा
झिण्याबाबाहा वाडा होता खेळाया आखाडा
सांचेपारा पोरं करिती खेळ खेळुनि राडा
वाड्यालगत रस्त्यावरति पेटायाची होळी
धमाल चाले नाचगाण्याची होळीगीतं वाडवळी
होळीआधी महिनाभर खेळति हुतुतु आट्यापाट्या
होळी पेटता चविने खाव्या चवळी ऊसळ वाट्या
वार्ता कराव्या मोठ्यामोठ्या जरि खोट्यानाट्या
झिण्याबाबाहा वाडा ओस आता खेळति भाट्या
..........एच्.आर्.कविवर.
No comments:
Post a Comment