Friday, 18 November 2016

झोळ्या बदला

✍ झोळ्या बदला
आयबाबानं आमाहाटी काय नय केल
अहे कार्टा -कार्टीये आयकटले बोल
गणोबा जाला रागानं तांबडा लाल
बेंडिखल्यांना काय करव्या बाकी रेलं

यांना एट मेट गोट हिकवल सुकल कारं
बगा कसरावेसणारी पोरं रस्त्यावरं
आवडस जर काय नहेन केल तुमाला
तर आपसात एकमेकाया झोळ्या बदला.

आजकाल एकदुहर भगुन ओथात लाड
पण त्याही या लाडल्यांना रेली नय साड
मागसी पीढी काम करते मोडुन अपुले हाड
पुडसी पीढी मात्र दावते नड गाते रड

..........एच आर कविवर.

No comments:

Post a Comment