Monday, 21 November 2016

प्रथा न व्यथा

✍प्रथा न व्यथा
बैल वापी देव्याही होती सालत आली प्रथा
बदल्यात भात नागली घेव्याही ओथी प्रथा
बाबू बंगाल्यान वापी दिलतोवा बैल वारल्या
वापी भात घेव्याहाटी गेलता बाबू बंगाल्या

वारल्यादा बोलला मी जातोय एका मयताला
कणगीसन पाच मण हुसल भात-नागलीला
पडत्या फळायी आज्ञा बाबू लागला कामाला
धनाया हांडा लागला बाबूबंगाल्या हाताला

बाबूबंगाली हांड्यासह बैलगाडी हेपाटत आला
पाठोपाठ वारलीदादाव बाबुया दारी उबाठाकला
वारली वदला बाबू महा हंडा मला परत कर
बाबू उत्त्तरला हंडा बिंडा तुहा नय आता विहर

बिसारा वारली शिव्याशाप देत हायखाऊन मेला
वारल्या तळतळाट बाबुया खानदाना भोवला
बाबू रगत ओकून तडफडत तिरडीवरुन गेला
बाबुहा कुलदीपक दारुपीवून अकाली
सोनापुरी गेला
बाबुह्या पुतणीन  जमीनजुमला हडप केला

पुतणी पारुबायस्या संसाराहा विस्कोट जाला
प्रथेही जाली व्यथा हपाप्या माल गपापा जाला.

..........हेमन  वरोरियन.








मयताला

No comments:

Post a Comment