Wednesday, 23 November 2016
शकुन-अपशकुन
माजर आडवी गेली हमोरसन विधवा आली
बाहेर कामाहाटी निघालेली वल्ली मागे फिरली
कारण अपशकुन जाला ,यातुन काय साधल
आजस उद्यावर ढकललं होणार काम खोळंबल
मध्यरातिला घुबडाया चित्कार जीवाला घोर
तोस घुबाडाया चित्कार गोर्या सायबाला शुभंकर
बर्ममुहुर्ताला जर का एखाद कुत्र रडव्या लागल
मंग हमजा एखादजण जग होडून देवलोकी गेलं
आता माजरीला रस्ता ओलांडव्या अधिकार नय का
विधवेला जो नियम तोस विधुराला लागू नय का
घुबडाला घाबरला भगुनस इंग्रजा गुलाम जाला का
महाणू रडला न कुत्रा मेला अह कवा घडल नय का
शकुन अपशकुनाया प्रथा महाणानस निरमिल्या
यास्तव व्यथा पण माहणालास भोगव्या लागल्या
भला लाभला जल्म माहणा बुद्धियं वरदान तुला
प्रथा न व्यथा इतिहासजमा घडव उज्वल भविष्याला.
............एच. आर.कविवर.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment