Friday, 18 November 2016

देरे नमो

👌दे रे नमो
दे रे नमो , दे रे नमो शंभराया नोट
सुट्या पैशाहाटी भटकुन खपाटले पोट

काडीबिडी काय मिळेना रोखीया बाजार
मीठ नय पीठ नय सुनसान जालयं हरेक घर

पै पैशाहे धंदे बहले जाली कुतर ओढ!
मोड नायरं जय तय अडुन रेलय घोड

एस्टी बसला मोड नय करतो तंगडतोड
तंगडतोड करुन आलेत तळपायाला फोड

सुट्यापैशा एक्चेंज हाटी भल्या भोट्या रांगा
रांगेमदे तासनतास उद्रेक घडवितो दंगा

काळा पैसा दडवुन धनिक बगतोय मजा
ईमानदार रमलुभगत भोगतोय काळ्यापैशाहि सजा

नमोजी काय हांगु सामान्यांही रोजसि त्रेधा
सोर होडुन संन्याशाला तरास दिला तू बुधा.

.............एच आर  कविवर.

No comments:

Post a Comment