Friday, 18 November 2016

भाताया पागोडा

👌भाताया पागोडा
अमदा दीवाळी मामाला पावली
वाड्यात भातायी उडवी रसली
बुद्धापागोड्यागत जही उभारली
मामाही मेहनत देवाला भावली

नारळी पोफळी खांब भोवताली
पागोडी उडवी वाड्यात हजली
पिवळ्याधमक होन्यानं भरली
मामाही मेहनत देवाला भावली

वाड्यात खळ्यात घेतील  झोडणी
बैल पातीला जुंपुन होईल मळणी
हेतातल्या होन्यानं कणगी भरली
मामाही मेहनत देवाला भावली

मामाय हेत बगा नवसाला पावलं
कुबेराय धन त्यास्या हेतात गावलं
अमदा दीवाळी मामाला पावली
मामाही मेहनत देवाला भावली

...........हेमन  वरोरियन.

रली

No comments:

Post a Comment