✍प्रथा नि व्यथा
अहा कहा रं देवा तुह्यात न तुह्या देवीत झगडा.
तू शाकारी पण तुह्या देवीला मात्र हवा कोंबडा
माह्या हेजारस्या पाठारे कुळात नवराति जागर
मंग बिज्या दिहा निवेदाहाटी कोंबडा न बिअर
लान -थोर जकल्यांना दारु न मटन नैवेद्य
बारक्यापणीस देवी नावानं तिर्थरुपी मद्य
अहे कोंबड्या बकर्या बळी देती देवीला
बिसारे देव मात्र विटले गूळ खोबार्याला
भगुन कलीयुगाही ऊलटीस सालली कथा
सुधाकर मद्यपी न बाईल सिंधुला व्यथा
कोंबाड्या बाकर्याहाटी जे कोणी वाटति वाटण
देव त्यांस्याहाटी वरति वाटतो वाटण
काळूबाईला बोकड बळीहाटी रेटारेटी जाली
शेकडो लोकं फुकाफुकी आपसूक बळी गेली
जगन्माता जीवदानी जगा जीवन देते
हांगा पावू खरसं का ती भगता बळी मागते
देवदेवी दगडास्या माहणानसं निरमिल्या
दैवतां काय लागाति गोष्टी त्यानसं ठरविल्या
काय हांगु प्रथा व्यथा नाडून राहिल्या
तुका -गाडगेमहाराजाही नय जुमानल्या.
.........एच. आर. कविवर.
तुका
कथा
ग
No comments:
Post a Comment