Thursday, 29 December 2016

आरोग्य जुन्या न नव्या पीढीयं

✍  आरोग्य जुन्या न नव्या पीढीयं

पालघर जिल्ह्यात बहुतेक सोपाक्ष गावं वहतात.बीज्यासमाजाहे पण लोक हंगतिला जुन्यापीढीसोबत नांदत आले.पण वाडवळी पीढी मात्र आरोग्य पाहणीत नंबर ए-1 ठरली.
धंद्याप्रमाणे मांगेलवाडीत मावर्या वास.समारा घरा सामड्या वास.भंडारवाड्यात आंबुस हूर.
बामणाही घर विरळ किंवा दुर्मिळ.

वाडवळ मात्र पीढीजात हरीतक्रांति करत निसर्गानुसार वागला व आरोग्यसंपन्न जाला.कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी.या कर्मवादामुळे
तो ईश्वर जुन्यापीढीवर जाला राजी.
आट्यापाट्या हुतूतू लगोरीगोट्या इ. खेळ खेळून जुनी पीढी बाहुबली ठरली.कधीकाळी आजार उद्भवला तर आजीबाईहा बटवा कामाला येई.
एकत्र कुटुंबपद्धतीमुळे मनावर सुसंस्कार घडत.निकोप निरामय आरोग्य लाभे.ताटात पडेल ते अन्न हे पूर्णबर्म मानुन खाव्याह.भगुन ते अंगी लागत होत.

     आता काळ बदलला.उद्योग नोकरी कामधंद्यापायी बाबू शहरात आला.शहरवासी जाला.विभक्त कुटुंब पद्धति आली.ओबाय हावुहहर्याला बजावुन रेली,हातपाय मोडा न खा.
आमावर तुमसा भार नको.बलाक सिस्टम मध्ये नव्या पीढीय जीवन कोंदाटलं.बाईबुआ चाकरमानी बाळा
पाळणाघरी जोजोरे.आरोग्याही विपरित हानि.हगल्या मुतल्या डाक्टरसि पायरी आरोग्य कायपण सुधरेना.

खाणंपिणं घराबाहेर.चायनिज गांडुळ
चविने खाती.हाटेलस खाणं मसणात जाणं.आतडी कमाजोर करणारं कोल्ड ड्रिंक ढोसति. ओल्यापार्ट्यांनाही ऊत भारी.
कहकाय लाभेल आरोग्य नव्या पीढीला.शाळा हुटल्यार कलासला धावा.खेळ खेळाया आवसर नय मैदान नय न परमिशन बी नय.
हत्तिश्या आरोग्याही ऐशी तैशी.

..........हेमन  वरोरियन.

No comments:

Post a Comment