दशाक्षरी
साद तुला मानवा
तू नूतन जगताची आशा
करू नको निसर्ग विनाश
या देशी तुज नसे वानवा
रक्ष रक्ष तू पर्यावरणा
साद देते तुला मी मानवा
दुःखी आहे आज वसुंधरा
समतोल सारा बिघडला
तूच आहेस जबाबदार
सत्य आकळेल तुज जवा
बडवशील तू फक्त ऊर
निघोनिया जाईल ती वेळ
हाती काही उरणार नाही
यावे भानावर आता तरि
उभारूनी सिमेंट जंगल
दुर्लभ जाण कांदा भाकरी
कवी- हेमंत राम पाटील.
दहिसर, मुंबई.
No comments:
Post a Comment