विद्याधन
विद्याधने श्रेष्ठपण, मनुष्यास आले जगी
कल्पतरू ज्ञानयोग ,देई त्यास जे जे मागी
विद्येवीण कफल्लक ,भीकेपोटी घे कटोरी
जगताचा स्वामी जरि, विद्या नसता भिकारी
विद्याधन श्रेष्ठधन ,चोर चोरू नच जाणे
बंधूंतही ना वाटणी ,किंवा कुणाची भांडणे
विद्याधन वाटा जगी , वाटताना वाढ होई
शिकविता पाठशाळा ,प्राप्तहोई स्वकमाई
आळशाला विद्या नाही , विद्येवीण धन नाही
निर्धनाला मित्र नाही ,मैत्रिवीण सौख्य नाही
देखा धनवान कैसा, धनानेच अंध झाला
विद्याधने देख अंध , ज्ञानचक्षू डोळसला
विद्याधन जयापाशी , सन्मानिल जग त्यासी
तिन्ही लोकी त्याचा झेंडा, फडकेल गगनाशी
विद्याधन महाशक्ती , बहुजना जगविण्या
बुद्धगांधी दीपस्तंभ , स्वप्रकाशे दीपविण्या
--- हेमंत राम पाटील. १९/१०/१८
दहिसर, मुंबई.8108419392.
No comments:
Post a Comment