वृद्धाश्रम
पाऊले चालती वृद्धाश्रमी वाट
नीजसंसारात हरवली खाट
जबाबदारीतून सोपी पळवाट
वृद्धाश्रमी वृद्धांची रवानगी थेट
स्वकमाईने उभारिले घरकूल
काटकसरीने राखी समतोल
नाही हौसमौज कसली सहल
हात नाही सुटला खर्चाया सैल
निवृत्तले ऐसे बाप्पा बेलवलकर
अपत्यांना बहाल केले घरदार
अपत्यें चालाख भलती हुश्शार
वृद्धाश्रमी भरती ऋण बाप्पावर
अरे बाप्पा सौ.चे होते म्हणणे
ताट द्यावे पाट कदापि न देणे
दात होते तोवर खाल्ले ना चणे
स्वीकार वृद्धाश्रम पंचाश्रम लेणें
किंग लिअरही सुटला ना यातून
ज्याने स्वराज्य केले लेकींना दान
पोटच्या लेकींच झाल्या त्या दुष्मन
वृद्धाश्रम होवो वयस्कांना वरदान
हेमंत राम पाटील. 8108419392
B-201, त्रिवेणीसंगम,तावडेवाडी
एल.टी. रोड, दहिसर(प),मुं-400068
No comments:
Post a Comment