दशाक्षरी काव्य
गोवर आली , करू स्वागत
गोवर बाय आली वस्तीला
फूलपत्री अलंकार साज
चंदनी पाऊली प्रवेशित
भाणोशी सदनी विराजली
गोवर आली करू स्वागत
माहेराशी आनंद सोहळा
गोवर बायजी हरखली
हिरवा शालू लागला खुलू
सखया सार्या होऊन गोळा
घालून पिंगा लागल्या डोलू
गोवराईचा नैवेद्य खासा
रांधियला ताजा बासा मासा
गोवराई जेवली थाटात
माहेरी झाला मोठा उल्लास
गोवर पूजीली भादव्यात
कवी- हेमंत राम पाटील
मुंबई --१६/९/१८.
8108419392.
No comments:
Post a Comment