बापू
तुह्या नावाये मोप बापू उदयाला आले
मायाजाळात अडकवून भक्ता वेडे केले
तू फाँरिनरिटर्न सूटबूटधारी महा बँरिष्टर
पण आखूड धोती स्वदेशी उघडा फकीर
कमावली अहती कवडीक दौलत गाठी
देशप्रेमी वेडा परि कष्टला देशमुक्ती हाटी
बापू नाव धारून बनिये आश्रम खोलले
शिष्यांना गंडवित बो शाही जीणं जगले
सब्बन पापी न बाजार मांडणारे मंबाजी
देवाला देखिल वेठीला धरलं रं बापूजी
राम रहीम रंभां नासवून घेत होता सुंबा
राजकारणी पण भुलतात बापूया दंभा
बापू इंग्रज परवडले बिना शस्र तू लढला
आता ते पाक अतिरेकी घणाघणा मातला
बेंल्या तू सांबाया अवतार बापूजी भोळा
पाकनं वाटणी लाटून केसान कापला गळा
पावू कय बापूजीला आजतक शोधून रेले
सादे जीवन उस्से विसार दिहती ना भले
दोन आक्टोबर साजरी करतो गांधिजयंती
स्वच्छतेया दिखावा घेवोनिया झाडू हाती
कवी - हेमंत राम पाटील
दहिसर , मुंबई.२/१०/१८
No comments:
Post a Comment