काय करील सद्गुरू
प्राशी वारूणी गंडेरी बाबा प्रवचन करी
भरपूर यथासांग दृष्टांताचा मारा करी
बाबा रंगे शामरंगी विठोबाच्या देऊळात
भक्तगणा ओवीरूप पाजी सारे ज्ञानामृत
बाबा देख बिलंदर जैसा चोरावर मोर
नच लावी ताका तूर खोदी उंदीर डोंगर
गरगरा फिरे आत्मा घाली व्यर्थ येरझारा
हरिमुखे म्हणा सारे चुके चौर्याशीचा फेरा
भक्तभोळा रे बावळा उमजेना काग काळा
बुवा करी कावकाव राव गणी जपमाळा
बुवाबाजी फोफावली ठार वेडे अनुयायी
अर्पूनिया द्रव्य सारे रडतात ठायीठायी
टाळ कुटून संसारी गडी कष्टेना शिवारी
शिवशंकराचा गांजा भक्त गांजून भिकारी
बापू बुवा बाबा भोंदू नका नाद त्यांचा करू
होई वेडापीसा जीव काय करील सद्गुरू
----- हेमंत राम पाटील. दहिसर-मुंबई.
8108419392.
No comments:
Post a Comment