दशाक्षरी
माऊली
आभाळागत माया अपार
तुळता तुळे नच कदापि
प्रेमाची वटवृक्ष सावली
मापता थिटे अंकगणित
मायेचा पदर तू माऊली
माऊलीवीण विश्व हे शून्य
तिन्ही जगाचा स्वामी भिकारी
माय महिमा अपरंपार
बाळा घडवी विश्वमानव
शिकवोनी जीवनसंस्कार
संस्काराची अमोल दौलत
उद्धारी कन्यापूत्र भूवरी
अथांग मायेचा हा निर्झर
फुलविण्या शैशव बगीचा
पाझरतो चिर निरंतर
कवी - हेमंत राम पाटील
दहिसर, मुंबई.
No comments:
Post a Comment