Saturday, 27 October 2018

कोरडेपाषाण

कोरडेपाषाण

कोरडेपाषाण तुम्हीहो  कुंपणावरचे सरडे
शासनदरबारी कामकाज लालफितीत अडे

कोरडेपाषाण अतिरिक्त वेतनही पदरी पडे
तरिही नीज कर्तव्यात पेंड खाते कुठे रे घोडे    

कागदपत्राची दखलही जर घ्याविशी ना वाटे
मग जावे तरि का सरकारी नोकरीचिया वाटे

काम दिसामाजी थोडे तरि म्हणती अतिलोड
खुर्ची तापविती सातघंटे धारिणीवर धुळवड

नोकरीस्तव घातले का रे मध्यस्थांना साकडे
मोजलेही असेल दाम चहापानास्तव रोकडे

कोरडेपाषाण ऐसे कैसे झाले दरबारी मुखत्यार
ऊतून मातून मोप करून राहिलेत भ्रष्ट आचार

आम्हा माळीयाची जात पडताळणीस रवाना
तप लोटले धारिणी गायब खाद्य उंदीरमामांना

जोवर या कोरडेपाषाण खाबूंचे आहे अधिष्ठान
कैसे यावे अच्छे दिन नि व्हावा भारतदेश महान

   कवी-  हेमंत राम  पाटील. दहिसर,मुंबई .
        8108419392

No comments:

Post a Comment