Friday, 20 July 2018

गाळी

गाळी

गाळीनं कोणसी तोंडं जाली का काळी
अह कवा घडलं नय कोणत्यास काळी
गाळी फुलास्या माळी कुणास्या भाळी
जवाया विगवी कासू बायजी रावताळी

जवाय दे गाळी हावूहहर्यां रोज हकाळी
मिळे स्वर्ग अही वदंता ऐकलायं भूतळी
दुबळं पोरं अन्याय होता देत हुटतं गाळी
अस्त्र रामबाण देखून थरथरतो बाहुबळी

जही जेवणाही लज्जत मीठ वाढवी बाळी
तह वाढवी बायबोली सौंदर्य गाळी-टवाळी
गाळीविना सण अळणी गिरिजनांही होळी
गाळी वगळता निकामी रिक्त जेष्ठांची झोळी

.....हेराम कविवर.8108419392.

No comments:

Post a Comment