फाँरवरडेड रतीब
दादूभाय फारवरडेड लोक मोप दिहतात
उहने राजरोस टपाले घणेस फा़रवर्डतात
आला संदेश तहास कटृयार टोलवतात
जहकाय झुरळ कपड्यावरस झटकतात
टोलवाटोलवी काय डोंबलं संस्कार घडवी
रोजरोज डिलेट मारून बोटं मातुर दुखवी
एक वाडवळ कटृटा काय तो जिताजागता
बाकी दिहोदिही पाठवतात आयता खलिता
आयजी जिवावर बायजी उदार तही गत
रात गयी बात गयी तेस ते घडतेय परत
जकल्यात भयंकर हाय विडिओ क्लिप
मोबाईलसी मेमरी खाऊन टाकी गपसूप
अंती काय शेठशी हिकवण झाप्यापावत
अन झोटींगाही वरात दगडी कोटापावत
तुमी फार वरडत रेवा रोज रतीब लावा
पण तो रतीब अमूलसा नको घरसा हवा
.....हेराम कविवर.810841 9392.
No comments:
Post a Comment