सत्यवादी
सत्यवादी ना घाबरे समाजकंटका भरे कापरे
तुम्ही पीटा विकास डांगोरे वाजवा ढोल नगारे
दुरून डोंगर साजरे आतून उंदीर मामा पोखरे
नशिब जनांचे भलेबुरे सोशित साहती बिचारे
विकासक उभारी घरे गरजू पणाला लावी सारे
स्वप्न घराचे राही अधुरे डोळे तयाचे थिजलेरे
नळी फुंकली सोनारे इकडूनतिकडे गेले वारे
सांगा बरे नवपरिणित कसे नांदतील सौख्यभरे
भ्रष्टाचारअति फोफावला तयाचा धनी कोणरं
आरोप प्रत्यारोप एकमेकावर हेच आहे उत्तर
तुका सांगोनिया गेला ठेवा देवावरी सारा भार
देवराय आहे पंढरपुरी ठेवोनिया कर कटावर
.......हेमंतराम कविवर. 8108419392.
No comments:
Post a Comment