कविता आँफ द डे
३१-७ -१८
हिरवा डोंगर
हिरवा डोंगर माथेरान आहे माझा निसर्ग देव
जपली आहे हिरवाई प्रदूषणमुक्त दैवी ठेव
वाट आहे नागमोडी वळणाची चढ-उताराची
वृक्षवल्लरींनी सजलेली मनोहारी राजमाची
माथ्यावर घनदाट झाडी नाव साजेसे माथेरान
हवापालटासाठी वसविता झाला गोरा मिल्टन
धनिक पारसीइराणी उभारल्या टुमदार हवेल्या
स्थानिक ठाकरांनी रानमेवा भाज्या पिकविल्या
वाहनांना पूर्णबंदी धूरविरहीत निसर्ग जोजवला
अश्व-सवारी पायी भ्रमंती प्रवासी तांडा चालला
वनवासी रमे वानरटोळी दावू नका नाना कळा
डोंगरकड्यावर घोडदौड रपेट जीवास सांभाळा
सनराइझ सनसेट वनट्री हनिमुन वा मंकी पाँइंट
कितीक ऐसे नामांकीत पाँइंट भीड मुशाफीर थेट
वनराणी मुशाफिरी बहु मजेशीर नेरळ ते माथेरान
डोंगरदेवा हिरवाळीचे दिधले माथेरानी चिरवरदान
कवी- हेमंत राम पाटील. दहिसर मुंबई.
8108419392.
No comments:
Post a Comment