Tuesday, 24 July 2018

दुप्पट खाशी

* दुप्पट खाशी*

माणकू बाय माणकू बाय आषाढी  हाय
कडक उपास हांगते एकादशी धरलाय

खादाड माणकू भलतीच खादाड बाय
दिहीभर खा खा खाणं बो बो हादडलय

हकाळी उठली आणि धाप तिला लागली
  हांगते गोळी घेव्याला फुरसद नय भेटली

कायतरी खाऊन माणकूबाय गोळी घेते
बाजारासन आणलेली पिकीकेळी खाते

गोड सफरचंद माणक्याभाऊनं आणले
उपासा नावाखाली तिने तीन-शार खाल्ले

फळं बीळ खाऊन पोट काय भरल नाय
हाबूदाणा वडा खावून एकादशी करतेय

उपास उपास घोकंपट्टी भूक काय मिटेना
येताजाता मुखी फराळीचिवडा नि रसपाना

राजगिरा थालीपीठ धाडले अन्नपूर्णाबायनं
दोनतीन थालीपीठ फस्त केली माणकूबायनं

कवडक हादाडते बोले थोडेस लागते मला
दिहीभर उपास करून थकवा आलाय मला

जेवणाही सर बिलकुल   येत नय फराळाला
उपासहांगता माणकूबायसा बो पोटोबा जाला

विठ्ठला विठ्ठला माणकूबायनं  धरली एकादशी?
प्रसादाया फराळ मोपअति किती दुप्पट खाशी

....हेमंतराम  कविवर.8108419392.

No comments:

Post a Comment