झाड होड
झाड होड झाड होड झाड होड वेताळा
कोळ्या भगत घुम घुम वार्यागत घुमत होता
कडुनिंब डहाळीनं भूतबाधित अजाणबाळा
झोड झोड सपासप एकहरका झोडत होता
कोळ्याही पोरं भुतभगावं गीत गावू लागले
देव तो फुकाया मांडला रे देव फुकाया मांडला
एक पींडाये सात पींड जाले सात पींड जाले
कोंबड्याहा वाटा पोटभरू गोट्या धांगड्याला
भगत डोलू लागला वेताळाशी बोलू लागला
क्यावर येणं जाल वेताळा क्याहाटी येणं जाल
तुह्या अशिलानं चिंचझाड वेढून ताबा घेतला
चिंचेवर आक्रमण जालं भगून भुतानं झपाटल
कोळ्या भगतानं मांडवणी लय झँक केली
आरवते कोंबडे देवून झाडाया वेढा काढला
झाड होड जादूगीरी भगताही सफल जाहली
आरवता कोंबडा गेला भूतानं होडलं झाडाला
......पी. हेमंतराम कवीवर.8108419392.
No comments:
Post a Comment