नको शीष्टपण घाण
मी वोळखून हाय दांभिक शीस्टांसे बहाणे
त्यांसे बोलणे सालणे अन बो घमेंडी वागणे
देखल्या देवा दंडवत तहास तुमा रामराम
बाकी चंबूसम तोंडे बंद ठेवा घालून लगाम
सादे शिष्टासार उपेक्षित गुंडाळूनि बासनात
खोटा मुखडा धारूनिया वावरती जगतात
काय बाता मारिती गोर्यांसा जपी प्रोटोकाँल
या गोर्या गिधाडांनी लुटला हिंदूस्तानी माल
तुमसा खोटेपणाया काळा बुरखा हटवा जरा
मंग दुनियेला दिहेल प्लास्टीक सर्जरीचेहरा
रंग वरलिया गोरा आतून काळे मनोव्यापार
कोण ठोठावील बरे ऐसे तुमा शीस्टांसे द्वार
शीष्टांसी उठबस पावता दिहे माहणू शीस्तीसा
भोट्याघरसी पायरी उस्सी पोकळ जरि वासा
बड्याघरसा बेटा सवाई उडवितो रे बापकमाई
ऐसे शीष्टपण घाण देवू नको वर बाप-रखूमाई
......पी. हेमंतराम कविवर.8108419392.
No comments:
Post a Comment