बोडणाया खाडा
पाटलायी बाव वरोरी विख्यात बारमाही पाणी
बावीभोवताली दोन खाडे तुडुंब जल बोडणी
एक बोडण माधवबाबाहे बिजे होथे रामदादाहे
तोय बो त्यामधि कपडेधुण्याहे न आंगधवणीहे
बोडणात लावलेले आळू जोमात डौलात झुले
वालाआळवाही आमटी ओरपून कैक धन्य झाले
होळीउधळ्याला कवडेक गडी बोडणी लोळले
बोडणात जे लोळले ते जीवनसागरी उद्धरले
धन्य धन्य ते बोडण नाम त्यावरसन बोडण्या
डायमाहण हांगतात त्यावर मजेदार काण्या
दगड्या धोंड्या भारण्या भुकट्या गावोगावी
बोडण्याहे बांधव जकले तयांना नमितो कवी
...........पी.हेमंतराम कविवर.
No comments:
Post a Comment