आरती धोंड्यामारुती
जय जय मारुतीराया अवतरला मांडेग्रामा
भक्तिभाव साकारिला धन्य मांडेकर मामा
मामाया बावीत गाळ काढता शिळारुपे प्रगटला
तुकता तुकेना शिळा बहुजन थकला भागला
काय करावे आता चिंताग्रस्त झाले मामा llजय जय ll
मंग कोण्या भक्ताया स्वप्नी हनुमंत आला
सपनात येवोनिया भगता दृष्टांत दिधला
सासरे जवाय मिळून घ्यावा हुसलून मजला
सासराजवाय भगतद्वये शिळाभार वाहिला
स्थापिला मारुती विधिवत मंदिर-धामा llजय जय ll
धोंड्या मारुती मांडे गावी महाशक्ति प्रदाता
अनुभव येतो भक्ता मनोभावे भजता हनुमंता
भिमरुपी महारुद्र वज्र हनुमान ऐसा मारोती
मुजबादेवी कृपाहस्ते दुजे दैवत धोंड्यामारुती
आरती रचियता कविवर धन्य अंतर्यामा llजय जय ll
...,,,,,,,.,. पी. हेमन्राम कविवर.
No comments:
Post a Comment