Monday, 1 May 2017

आई एकविरेह गाव

आई एकवीरेह गाव

आवार हिरवं हिरवं हिवार हिरवं हिरव
डोंगरकपारीला आई एकविरेहं गाव
हरघडी वाटते या गावी जाऊन रहावं
एकविराहे गावायं हाय ताडवाडी नाव

पुरातनकाळी दिहली एकविरेही पावलं
गावकरी भक्तिभावे देऊळ बांधियल
देवळात पूजियली मूर्तीरुप कुलदैवत
आजही दर्शनाला भक्त येती मिरवत

एकविरा माय कार्ला डोंगरावर ठाय
नजर जकल्यावर देई भाविका प्रत्यय
यारे सब्बन भगत फूल श्रीफळ घेऊन
देवी होय प्रसन्न पत्री खण ओटी भरून

क्यालारं फुका देवीला ठरविता अघोरी
कोंबड बोकड बळी दाते तिहे हाडवैरी
राम कष्ण महादेव जर का शाकाहारी
मंग देवी देवता का ठरविता मांसाहारी

देवीया नावे आप्पलपोट्यांही पोटपूजा
मटणमसालीमजा देवी भजाभजाभजा

..........पी. हेमंतराम कविवर.

No comments:

Post a Comment