स्टोरीवरोरी
स्टोरी वरोरी लय भारी घडली ओथी खरोखरी
च्यामारी वेठबिगार वडारी आलते करव्या मजुरी
हांस्यापारी मांगेलवाडी मंडळी पयली धार मारी
रातस्याला अवतिभवतिस्या घरांवर धोंडे मारी
होळकर नानूमामा भूताळ्या ओथा लय तापट
कौलारु घरावर त्या फेकते जाले गोटे पाथरवट
ऐन होळीला बेलदारी दगडी उधळा कौल फोड
बेलदारीवरात काडव्या नानूय कतोबाला साकडं
मंग नानू भूताळ्याला कतोबानं हप्नात दृष्टांत दिला
गावतळ्या आंबा तोडून वडार्यांवर आळ आणला
फौजदारायी मूठ दाबून बेलदार जेलबंद करविला
हातापाया पडून बेलदार हुटला न गाव होडून गेला
..................हेराम वरोरकर.
No comments:
Post a Comment