Wednesday, 17 May 2017

यमराज

यमराज यमराज थकलाय आज
ठप्प पडलय हुरुमभर कामकाज
रेड्यावर पहुडला उघडाबंब यमभाय
कवडाक ओढेन ओझं निर्जीव जीवायं

यमा यमा तू भोगाधिना देतो मुक्ती
मुळी न तुला मिळे पळभर विश्रांती
दुःखी दरिद्री जनाहा खरा सोबती
मरण देवून देई मुक्ती सकलांअंती

अमरत्वाया शाप तुला जन्मठेपी सजा
मरणी जग जगते तू अभागी यमराजा
सलाम तुह्या निष्काम कर्म महायोगा
मृता सद्गती देत तू मात्र अविरत जागा

.........हेराम  कविवर.रा

No comments:

Post a Comment