स्वातंत्र्यवीर सावरकर
धन्य धन्य स्वातंत्र्यवीर सावरकर
प्रेम अनिवार माय भूवर धन्य अवतार
देशाया कामी जे जे लढणार
त्यांसा जयनाद जो जो होणार
कविवर शाहिरी कवन करणार
पवाडा हेमराम शाहीर गाणार जी जी जी
निस्वार्थ देशप्रेमाहा आदर्शाया महामेरु
कैक क्रांतीवीरांसा स्फूर्तिदाता आधारु
कणखर प्रखर जाज्वल्य हिंदुत्ववादी
सशस्त्र क्रांती उद्गाता महा तेज बुद्धिवादी
कितीक हालअपेष्टा सोसत झुंजला वीर
अंदमानसा तुरुंग हाय प्रत्यक्ष साक्षिदार
स्वातंत्र्याच्या नभांगणी तेजस्वी तारासंभार
त्यात एक तारा स्वातंत्र्यवीर झुंजार जी जी जी
असामान्य आमसा देश महासत्ता होणार
परदेशाये मनात मांडे पदरात धोंडे पडणार
हा देश शिवरायासा लोकमान्यासा स्वातंत्र्यविरांसा
जरि नाना लोक नाना जाती नाना वेश आणि भाषा
स्वातंत्र्य संगरी पूर्णाहुती देऊन जे वीर झाले अमर
त्या क्रांतीसूर्यांना थोर हुतात्म्यांना कवन हे सादर जी जी जी.
........शाहीर हेमंतराम पाटील.
No comments:
Post a Comment