Saturday, 6 May 2017

अठवरा नवरा

अठवरा नवरा

हेतकरी पूत रेलयं अठवरा वय वहर छत्तीस
देत्या जाल्या लग्ना नकार पोरी त्या बत्तीस
हेती करता करता जवान दिहू लागला म्हातारा
पोरी हांगे हेतकरी डोकरा नकोग असला नवरा

मातीहा माहणू राब राब राबला काळ्या मातीत
पाटा नय फुटला भगुन कोवारा हाय तो चिंतित
पोरी हिकुनशान शाण्या शहरी नवरा वरतात
भगून भावी तरुण हेती खपव्या करती नापसंत

ऊजाड होईल ओसाड पडेल उपजावू भूमी
काय करेल विष्णू वरणार नहेल जर लक्षुमी
जय जवान जय किसान नारा जरि हा खरा
हरेक वांछी जवान किसान नको पोते घरा

...........पी. हेमंतराम  कविवर.

No comments:

Post a Comment