Monday, 22 August 2016

आठवणीतले वाडवळ गुरुजन

✍🏼 आठवणीतले वाडवळ गुरुजन.
स्वच्छ धोतरसदरा गांधीटोपी डोईवर
दुसरिया वर्गावर आले गुरु मोरेश्वर
हसत खेळत नाचत गायन कला
शारोळी भिडल्या कायम हेमनाला

दादा गेले बंदराला
किल्लि राह्यली त्याहा कमरेला
आई घरात काय करते
छोट्याशा बाळाहा भांग पाडते

आख्खा वर्ग तालावर नासे डोले
गुरु नटवर जहे काय भूवर अवतरले
रोड्यामास्तर म्हणून जन बाहे त्यांना
कला कौशल्या सह दिधले बहुज्ञाना

ऐसे वाडवळ गुरु मोरेश्वर पाटील  दिधला जीवनी ज्ञानरुप परिमल
अभिवादन अजि मनःपूत गुरुवरा
शब्दरुप गुरुदक्षिणा देई हेमन मोरेश्वरा

................हे.रा.वरोरकर.

No comments:

Post a Comment