Monday, 24 October 2022

*सफल स्नेहमयी चारधाम तीर्थयात्रा*

श्री सिद्धिविनायक *नेहानिल* टूरटूर पर्यटन
उत्तम बडदास्त ठेवून सोयसुविधा करती  प्रदान
जेष्ठश्रेष्ठ बहुजनांसी सांभाळीती देती सन्मान
कवतुकमय आपुलकीने साजरे करीती वाढदिन

तेहत्तीस पर्यटक नांदले घरोब्याने पंधरा दिन
सन्मान राखून एकदुजा योगायोगे जुळली मनं
चारधामी यात्रा सफल जयजय हिंदूस्थान
उत्तराखंड देवभूमी सृष्टीचे सौंदर्य नंदनवन

सह्याद्रिचे पुत्र आम्ही केले हिमाचली प्रस्थान
उंचपहाडी बर्फाचे पर्वत साजिरे रमले हे मन
बद्रीविशाल देखता व्हावे हीनदीनही महान
केदारनाथ बाबा कृपावंत होई देई दया दान

गंगोत्री जय गंगे भागिरथी  व्हावे गुणगान
यमुनोत्री घोडेस्वारीचा अनुभव घ्या छान
हरिद्वार  देवभूमिचे प्रवेशद्वार विसरावे भान
ऐसी ही देवभूमी साधूसंतांची धन्य पावन

 अर्पून तनमनधन सेवा सार्थ व्हावे जीवन
श्रमिक जनामध्ये देव पहावा द्यावे अर्थार्जन
निसर्ग हाचि देव डोंगर दऱ्या  वृक्ष  हरितोद्यान
आनंदकंद चारधाम ऐसा देई मना समाधान

श्री सिद्धिविनायक टूर्स घडवी सकला पर्यटन
हेराम कविवर अर्पितो तयांना कवनरुपी  सुमने छान

     
 हेमंत राम पाटील. 8108419392दहिसर , मुंबई. 
          २४/१०/२०२२.

No comments:

Post a Comment