Thursday, 20 October 2022

वाडवळ बाप

🌹🌹कविता🌹🌹

   वाडवळ  बाप.......

बाप यो वाडवळी हिवारात विहरतो
दिवसरात राब राब बो बो राबतो  !
उधारी-पाधारी न तगाइ फेडत राहतो
कायस उरेना अंती कणगा रिता राहतो..

आचारी का बिचारी होय बाप भोळा
सदा काळजीत भणव्व्या पोरीबाळा
 शिकूनसवरून गाडी लागावी रूळा
ही आस ध्यानीमनी त्याया सर्वकाळा..

घर न वाडी योस विसार वसे मनात
पीक आल्यावर येईल जरा बरखत
दिस येतात जातात अन राती सरतात
आशा ठेवून उरात बाप कष्टतो रानात ..

ऐसा तुमसा आमसा कष्टाळू बाप
तापतो निंबरात डोकी मोप ताप
जकल्यांवर जीव लावी त्यांही खोप
 लावितो रोप सर्वांभूती वाडवळी बाप ...
   
       पी. हेमंतराम कवीवर. 
B 201, त्रिवेणी संगम संकूल,
लो.टिळक मार्ग, दहीसर, मुंबई, 400068.
भ्रमणध्वनि   8108419392.

 , तुषार दिवाळी अंक, 2022-23  मध्ये
 प्रसिद्ध.

No comments:

Post a Comment