वँलेंटाइन स्नेहमयी सहल समारोह
श्री सिद्धिविनायक नेहानिल टूरटूर पर्याटनउत्तम बडदास्त ठेवून सोयसुविधा करी प्रदानजेष्ठस्रेष्ठ बहुजनांसी सांभाळीती देती सन्मानकवतुकमय आपुलकीने होती साजरे वाढदिन
तेहत्तीस पर्यटक नांदले घरोब्याने पंधरा दिनसमासमी जुळूनबंध योगायोगे सुयोग वँलेंटाइनमेवाड मारवाड दौरा सफल जयजय राजस्थानसह्याद्रिचे पुत्र आम्ही केले अबूपहाडी प्रस्थान
वाळवंटी वाळूचे डोंगर मरूभूमी रमले हे मनतंबूनिवास जैसलमेरी नर्तनगणी अनुभव छानउंटावरची सफर राहील मम स्मरणात दिनोदिनबिकानेरी जयगड सुंदर उंदिरमामा मंदिर महान
उदयपूरचे शिल्प गाती राणाजीचे पवाडकथनजोधपूर पूष्कर अजमेर देखता हरपले भानचितोडची राणी पद्मावती धन्य धन्य पावनअब्रू रक्षणार्थ केला जोहार अपुले प्राण अर्पून
जयपूर गुलाबी पत्थरमय वाळवंटी नंदनवनजंतरमंतर आमेरगड बिर्लामंदीर हरितोद्यानआनंदाचा कंद ऐसा देई मना अति समाधानश्री सिद्धिविनायक टूर्स घडवी सकला पर्याटन
हेमंत राम पाटील. 8108419392दहिसर , मुंबई. 14/2/2019.
No comments:
Post a Comment