Friday, 21 October 2022

वाढवण बंदर

वाढवण बंदरापायी  ........

नकोरे आम्हा वाढवण बंदर झालं ते अती झालं
अंत पार होणार भूमिपूत्र भारवाही हो हमाल

पँरेडाइससिटी फसवणूक मोठी हाती करवंटी
वाढवण बंदर खयभंग होणार लल्लाटी लोटी

मांगेले भंडारी माळी दर्यावर्दी अवघे डुबणार
कोण त्राता तूर्तास ना बेवारस वाढवण वरोर

काळी माती आमची आई होईल ऊजाड रानं
हाती येईल धुपाटण गाढव मरतील ओझ्यानं

कितीतरी नुकसान ग्रामवासीयांचे बंदरापायी
बाटलीत बुडेल तरूणाई जरी मिळेल भरपाई

सावधान हो रमलू भगता बुद्धि ठेवून शाबूत
नाहीतर भावी पीढी जकली येईल गोत्यात

शहाण्याला ईशारा काफी चुकीला ना माफी
एकमेका सोबत राहून मिळवावी इनसाफी

वाढवण बंदरापायी तुम्ही व्हा पालखीये भोई
मिरवतील मतलबी राजकारणी बनुन भाई-भाई

        पी  हेमंतराम  कवीवर.
दहीसर,मुंबई -
संपर्क- 8108419392.


 तुषार दिवाळी अंकात प्रसिद्धी .२०२२- २३.

No comments:

Post a Comment