वाडवळी अभंग
आमी वाडवळ l पिकविले मळे l
दिली कंदमुळे l बहुजना ll
सरावण येता l स्वयंपाक मोळा l
सात्विक भोळा l समाधानी ll
दोन गुंठे वाडा l घरा पाठीमागे l
भाजी भेंडे वांगे l लागवड ll
रमाई वाड्यात l पावसाळी भाज्या l
घण्याघण्या ताज्या l स्वस्तमस्त ll
बावी भोवताली l आळवाचा खाडा l
हिपण्यानं माडा l तरारला ll
काकडीच्या वेला l लागल्या काकड्या l
जरि त्या वाकड्या l चवदार ll
भाटात पेरला l पावटा उळीद l
समद्यांना खाद l तोंडीलावा ll
वय उंबर्याला l केळी नि पपया l
पक्वफळ खाया l सुमधूर ll
आंब्या ओहतारी l उगवले धेणे l
ईश्वराहे देणे l हेरा म्हणे ll
.....पी.हेमंतराम कविवर. दहिसर-मुंबई.
8108419392.
मा. तरंगदा, आगामी वाडवळी बुकाहाटी
वाडवळी अभंग देत आहे.कृ. नोंद व्हावी.
No comments:
Post a Comment