लगीनगीत
सला सला सला लगीनाला सला
साळकाया माळकाया लगीनाला सला
वाडवळ माळी नवरा महान
माळीण बाय शोभे नवरी छान
नाचूया गाऊया हरपून भान
गानूबाय घेई तानेवर तान
नवरा बोहल्यावर खोळंबला
मामार्यांनो आणा नवरीला ll सला सला...
वर्हाडी जमले पाटील राऊत
पुरव -चौधरी म्हात्रे -ठाकूर
लगीनमंडपी बाया-बाप्यांसा
पोरापोरींसा कल्लोळ फार
लग्नगीतं धन बायबोलीला
जावू सला धमाल पहायला ll सला सला....
झडे चौघडा वाजे बेंडबाजा
वाजे ढोलक वाजे सनई
सुरावटीया नादावरती
पायी थिरकली बो तरूणाई
अंतःपटाया अडसर सरला
नवरी मिळे ही नवर्याला ll सला सला.....
कविवर हेमंतराम पाटील - दहिसर-मुंबई.
No comments:
Post a Comment