Friday, 27 September 2019

गे माय वाडवळी

🔤गे माय वाडवळी ....

गे माय वाडवळी तुह्ये कहे होवू उतराई
माही झरणी पाझरून तुहेस कवन गाई....||धृ||

बायबोलीहा डोलारा माही लेखणी पेलेल
तुह्या शब्दरूप आभाळा गवसणी  घालेल
बायबोली तोरण बांधू येथं वाडवळ भाई
गे माय वाडवळी तुह्ये कहे होवू उतराई  !!१!!

फडकवू निशाण नभी दुमदूमवू दिशादाही
तोलेल धरणीला शेषशाही वाडवळी माही
वर्धेल वाडवळी उणावणार नाही शाई
गे माय वाडवळी तुह्ये कहे होवू उतराई !!२!!

ऊघडले माऊलीने मायबोलीहे भांडार
चार हारी चार दारी ज्ञानघागरी घरोघर
आयाबायांनो  घातली वाडवळी ज्ञानपोई
गे माय वाडवळी तुह्ये कहे होवू उतराई !!३!!

भरा शब्दजले कलश घागरी तमाणी
वदनी लेखणी दिहू दे वाडवळी वाणी
आजविरी उपेक्षित परि आता नवलाई
गे माय वाडवळी तुह्ये कहे होवू उतराई !!४!!

आख्ख्या जगात आपुली मिरवू वाडवळी
अवघे मायमराठी कुंकू विराजो तिहे भाळी
सातासमुद्रापल्याड नांदो वाडवळी विठाई
गे माय वाडवळी तुह्ये कहे होवू उतराई  !!५!!

     पी.हेमंतराम कविवर. दहिसर-मुंबई.
8108419392.

No comments:

Post a Comment