कटृयाहा पाळणा
कट्टा जो जो रे मनमोहना । सुखवी वाडवळांना ।
रंजन करी सब्बना । पेरून शब्दधना॥धृ॥
पाळणा लांबविला नरपडासी । वाडवळांसे वंशी ।
बायबोलीह्या कुशी । उल्लास जकल्यांसी॥१॥
वाडवळी पालखी । कवडेक अनोळखी l
दाविती भाषिक कुरखी ! मंडळी नवखी !!२!!
हालवी परवीणा सुंदरी । धरुनी कट्टादोरी ।
वाडवळी वाजे पिपेरी । जयू जयजयकारी ॥३॥
कट्टाव्यापकां कवीराया । काव्य करी रमवाया ।
विडंबन करुनिया । जागर वाडवळीबोलीया ॥४॥
येऊनि कटृयावर सत्वर । देती प्रत्युत्तर ।
सबासद भगिनी बंधूवर। कवतुकती अपार ॥५॥
कविवर भावभुकेला । कट्टाधीन जाला ।
झिजवून झरणीला। पाळणा रचियला ॥६॥
कविवर पी. हेमंतराम वरोरकर.
8108419392.
No comments:
Post a Comment