Monday, 2 October 2017
वर्णव्यवस्था
वर्ण व्यवस्था
प्राचीन भारतीय वर्णव्यवस्थेमागे निश्चितच काही सुव्यवस्था होती.आता राखीव जागाच्या संदर्भात
डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी दहा वर्षांची डेडलाईन
दिली होती ती विचारपूर्वकच.कारण सवलतीची ढाल या दलीतांना कायमचे पंगू बनवेल हा धोका त्यांनी ओळखला होता.पण मतलबी राजकरण्यांनी हीच ढाल वापरून विविध जातीजमातींना एक दशकाची सात दशके झाली तरि सवलतीच्या नावाखाली स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली आहे.
जाती जमाती ही एका भाषिक ,वैचारिक,सांस्कृतिक
जीवनप्रणालीतून निर्माण झालेली समाज व्यवस्था होती.
प्रत्येक समाजाचे काही मानदंड,रूढी,परंपरा,रितीरिवाज असतात.त्यामुळे समाज मान्यता असलेले विवाह त्या त्या समाजात होत असत आणि विवाहोत्तर दोन परिवार जोडले जाऊन पारिवारीक जीवन निकोप निरामय शांत
रहात असे.काही कुरबुरी असतील तर समाजातील ज्येष्ठ
लोक सलोखा घडवून आणत.शक्यतो असे प्रसंग फार कमी घडत,कारण एकाच समाजातील परिवारांची ओळख परस्परांशी असते.
परंतु आजकाल प्रेमविवाहाचे फँड वाढल्यामुळे भिन्न जाती-जमातीचा संकर होवू लागला. मुलाने स्वतःच्या हिंमतीवर स्वतंत्र घरकुल घेतले असेल व होणारी सहचरी
जर कमावती असेल तर आईवडलांना प्रश्न नाही.
परंतु कैकदा स्वकमाई पुरेशी नसताना केवळ शारिरीक
आकर्षणापोटी प्रेमविवाह करुन आईबापावर पोराच्या संसाराच ओझं पडते तेव्हा त्या माता-पित्यांची काय अवस्था होत असेल हे न सांगताही अनुभवी जाणतील.
म्हणून आपण पाहत असतो की मुस्लीम त्यांच्या
मोहल्यांतून समुहात राहतात.हिंदू काँलनी,पारशी काँलनी
अशी विभागणी दिसून येते. वसईकर सिनोर येशूप्रेमी
एकत्र नांदतात.कळंबबीचवासी मांगेले लोक त्यांच्या गावातच रोटीबेटी व्यवहार करतात.डहाणू ,तलासरीतील
आदिवासी पाड्या पाड्यातून राहतात.अशी कितितरी उदाहरणे आहेत.हे सर्व समाजघटक आपापले कामधंदे
करून उदरनिर्वाह करीत. पण सवलतींचे गाजर दाखवून या बहुजन समाजाला राज्यकर्ते पंगू दुर्बल व ऐदी
बनवीत आहेत. आज कष्टाची कामे करायला कोणी तयार
नाहीत. मातीत हात घालायला राजी नाहीत.
प्रत्येकाला सुरक्षित अशी भरघोस पगाराची कमी मेहनतीची सरकारी नोकरी हवी आहे.पण आता ज्याला त्याला राखीव कुरणात किती काळ चरायला मिळणार.
संपली येथली ऊसाची गुर्हाळे संपला येथला अन्नाचा शेर.
पण आता दुजा मळा आणि दुजा अन्नाचा शेर आणायचा कोठून?
एकतर या सरकारी कर्मचार्यांच्या कामचुकारपणा व लाचखोरीमुळे सामान्य जनतेची सहानुभुती गमावून बसलेला नोकरशाही वर्ग हा राखीव जागांमुळे निर्माण झालेला फार मोठा गुंता आहे. जातीनिहाय दिलेल्या आरक्षणवजा अपात्र खोगीरभरतीला आलेले हे कटुफळ
आहे.जवळपास स्वातंत्र्योत्तर सत्तर वर्षे हा खेळ चाललेला
आहे.सवलती द्यायच्याच झाल्या तर आर्थिक निकषावर द्या म्हणजे जातीपातीचे राजकारण थांबेल.तसेच गुणवत्तेबाबत कोठेही तडजोड नको.जोवर हे होत नाही तोवर अराजकाचे दुष्टचक्र अविरत फिरत राहणार.
उलथून टाक आरक्षण, जातीपातीच्या भींती
होऊदे क्रांती पश्चात नांदेल भारती सुखशांती
............हेमंतराम पाटील.(वरोरकर).
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment