Monday, 11 December 2017

घुबड

घुबड

अरे घुबडाला क्यव मानती अशुभ मायभूमीत
माहणू लबाड सवताहे अवगुण झाकी मुठीत
हाच घुबड पक्षी गोरेइंग्रजांना ठरला रे शुभंकर
पहा घुबडधार्जिणे मुठभर इंग्रज जाले बलवत्तर

गोर्या टोपीवाल्या इंग्रजाइनं श्रेष्ठ मानलं घुबड
दीडशेवर्ष राज्यकरून लुटलं स्वर्णभूमी घबाड
एतद्देशीय अंधश्रद्धाळूभोळं कुटून राह्यले टाळ
मुखात राम मनात काम नि जपून राह्यले माळ

घुबडा घुबडा घारे डोळे इंग्रजांशी नाते जुळले
गांडाभाय पतंगकाटीत पाखरां जीवावर उठले
घुबडधारी राज्यकर्ते टोपीवाले सभ्य तरि होते
आता मारवाडीबच्चे भेंभोमा शिवीगाळ ओकते

.........पी. हेमंतराम कविवर.

No comments:

Post a Comment