मायाबाजार
जकला दुनियाभर स्वार्थाया बाजार
जडलायं माहणाला कलियुगी आजार
बेगडी बुरखा पांघरून हिंडे नारायण
दुहर्याला लावत हेंड्या जगतोय जीणं
लखलख लालदिव्या गाडीतून फिरतोय
जनधन सब्बन आपकमाई हमजतोयं
भाजतोय पोळी तापल्या तव्यावर
जनतेया तिजोरीवर नेताजीही नजर
भरोसा ठेव्यागत हाय काय व्यवहार
दिहे नय साफसुथरा उजळ कारभार
तूर्तास तरि घणी लांडी लबाडी पाही
तुहं ते माहं अन माहं ते कमाई बापाही
क्यालारं कोणसी हालहवाल विसारते
एकपुतीव रडते न सातपुती पण रडते
लेकुरं उदंड मोप, मातला सैतान भारी
गोड गोड बोलून गळा कापतो पुढारी
झाकली मूठ सव्वालाखाई घरोघरी
ज्ञानराज हांगून गेले सार्थ ज्ञानेश्वरी
माया लोभ जकला गुंता जटीलभारी
नाम घेता फुकाये तारी पांडुरंग हरी
कविवर हेमंतराम पाटील-वरोरकर.
8108419392.
No comments:
Post a Comment