ठकास महाठक
अवलिया आला दारा कुडमुड्या ज्योतिष
भोट्यान बोलला कुंडली तुमसी झकास
हात दावड जरा तुमसा पावतो भविष्यास
तळहाती तुमस्या बलवान हाय धनरेष
बरास वेळ घेवून हातात हात पावत रेला
पालथाकरुन बोले आजवरी पैसा ना टिकला
बो भोळा स्वभाव तुमसा झट भरोसा करता
काढून पैसा खिशातला पटकन देऊ करता
तुमी करता मदत दुजा तुमस्याकामी येत नय
राग राग घरात उगी लेकरांबाळांवर खेकसताय
जवळसं लांबसं कळेना तुमी हत्तीगत सरळमार्गी
पटकन पचतात तुमाला बीजाही पुराणाही वांगी
सुख लिवलं कपाळी तुमस्या हांगतो तेवढं करा
कुळदैवता भेट दे आय लक्ष्मीही ओटी भरा
तुमसा देव हांगतो गावठी कोंबडा बकरा मारा
पैका मोप येणार हाय तुमी ओंजळ खाली करा
मंग मी उत्तरलो,जोशा आता तुहं भविष्य ऐक
नवलाईनं मला बगत गर्भगळीत जाला ठक
बळजबरीनं मग त्याया हात हातात की घेतला
नय धनरेषा तुह्या हाती भिकारी ठक कुठला
अयला आलास तू ठका हाकलून बयेनं लावला
दारु, गांजा व्यसनापायी तू वस्तूवाणा विकला
पोरांटोरांना होडून आता संन्यास अहा घेतला
संधीसाधूबाबा पळभरही मायाहमोर ना टिकला
आयकून शब्दबाण उर्मी त्याह्या बो बो झोंबले
बंबंम भोले पुटपुटत दाढीहे दोन किही उपटले
भोट्टे डोळे करून उसासा होडत काळे तोंड केले
ठकास महाठक बनून कविवरे भामट्या नमविले
कविवर हेमंतराम पाटील - वरोरकर
8108419392.
No comments:
Post a Comment