Wednesday, 27 February 2019

मराठी राजभाषा दिन

मराठीभाषा दिन अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत जरि भाषा विसरू कसा मायबोली असे माझी राजभाषा अजाण आम्ही मायबोलीची अजाण लेकुरे जन्मदाते तुम्ही सुज्ञपालक आम्हा शिकविणारे इंग्रजाळू बाळू आम्ही तुम्हीच की घडवून धन्य कशास डांगोरा पिटती आत्मस्तुती पोकळ शून्य एबीसीडी गर्भसंस्कारी ऐसा अभिमन्यू इंग्रजी ऐकू द्या मायबोली भेदीन भाषाचक्रव्यूह आजी चार टक्के कसेबसे नावाजले इंग्रजी माध्यमातून उर्वरित शहाण्णव बघतात फक्त मोठा 'आ'वासून अजाणबाळा काही कळेना पालक त्यांचे मालक मग कार्ट वाया गेल म्हणून खाजवत बसती डोस्क मराठी दिनी घ्या प्रतिज्ञा मायबोलीतून शिकण्याची वेळ आहे मराठमोळा मराठीबाणा टिकविण्याची कवी - हेमंत राम पाटील. मराठी दिन २७/२/२०१९. दहिसर- मुंबई. 8108419392.

No comments:

Post a Comment