🇮🇳🇮🇳🇮🇳 *तिरंगा* 🇮🇳🇮🇳🇮
अभिवंदनीय गणतंत्रदिन
🇮🇳या देशाची शान आणि आन तिरंगा
आम्हा भारतवासीयांचा प्राण तिरंगा🇮🇳
🇮🇳जयहिंद नारा अमुचा,हाती तिरंगा
अखिल भारतीय गाती जयगीत तिरंगा🇮🇳
🇮🇳निळ्या आभाळी फडके अभिमान तिरंगा
तिन्हीलोकी श्रेष्ठ अमुचा भारतीय तिरंगा🇮🇳
🇮🇳क्रांतीकारक कुर्बान ,घेऊन तिरंगा
वीरजवान शहीद झाले मिरवित तिरंगा🇮🇳
🇮🇳सदैव लहरत राहो विजयी विश्वतिरंगा
अभिमानाने जपू मान वंदनीय तिरंगा🇮🇳
🇮🇳स्वातंत्र्याचे प्रतीक आमचा मान तिरंगा
अखंड एकतेचे विजयगीत तिरंगा🇮🇳
🇮🇳कोटी कोटी जनांचा प्राण हा तिरंगा
प्रण घेवू अर्पू प्राण आम्हा प्रिय तिरंगा🇮🇳
🇮🇳हुतात्म्यांची प्रेरणा सदोदित तिरंगा
ताकद आमुची वर्धमान बुलंदी तिरंगा🇮🇳
🇮🇳स्वातंत्र्यलढाई जिंकून विजयी तिरंगा
अविरत फडकत ठेवू हा विश्वतिरंगा🇮🇳
🇮🇳करतो आम्ही प्रणाम हा अमर तिरंगा
लाल किल्ल्यावर डोलतो डौलात तिरंगा🇮🇳
🇮🇳हा देश माझा महान, सन्मान तिरंगा
दैववशात लाभले वरदान आम्हातिरंगा🇮🇳
🇮🇳क्रांतीचा ज्वालामय अग्निपथ तिरंगा
जन्मभूमी भारतभूची रक्षक ढाल तिरंगा🇮🇳
सत्यमेव जयते ब्रीदवाक्य जयघोष तिरंगा
सव्वीसदली पुष्प अर्पितो कविवर तिरंगा
कविवर हेमंतराम पाटील.२६/१/२०१९
बी-२०१, त्रिवेणीसंगम,तावडेवाडी,
एल.टी.रोड, दहिसर (पश्चिम ),
मुंबई ४०००६८.M-8108419392.
No comments:
Post a Comment