Monday, 17 April 2017

अरण्यरूदन

अरण्य रूदन

वृक्षावीण जीणं जगति रुक्ष वैराण वैराण
नकोस कुठार्या वृक्षी घाव घालू दाणादाण
जंगल तोड बो अफाट  झाडं केली बुडलोट
घनदाट हिरवे रान झाले सपाट तप्त वाळवंट
कुर्हाडीचा दांडा नीज गोतास काळ झाला
अरण्यरूदनाचा आक्रोश भिडो काळजाला

डोंगर टेकडी माथे बोडके टकले टकुरे टकूर
केले माणसा मसाण तोडोनिया ऊंच तरुवरं
धरणी ही मायअपुली पुरती केली तू विटंबना
बरसावी बरसात म्हणून करी धोंडी आराधना
निसर्गदेवाला काटून छाटून ओकाबोका केला
अरण्यरूदनाचा आक्रोश भिडो काळजाला

का रे माणसा काहून अक्कल गहाण ठेली
स्वहस्ते भावी पीढी गाडण्या तू कबर खोदली
हरितक्रांति अखिलजगति व्हावी वृक्ष संवर्धून
करा परिमार्जन झाडं लावून जंगल जोपासून
वृक्षवल्ली आम्हा सोयरे तुका सांगोनिया गेला
अरण्यरूदनाचा आक्रोश भिडो काळजाला
 
अरे माणसा माणसा जप तू वृक्षमित्र बाणा
वन्यजीवांही लाभू दे आसरा नि वैरणदाणा
सर्व काही तुजसाठी पैदा करत नाय सर्वेश्वर
सत्ताहीन स्वदेह तुझा उघडा जाशी सरणावर.
खयभंग होण्याआधी सावरं मानवा स्वतःला
अरण्यरूदनाचा आक्रोश भिडो तव काळजाला

.........पी. हेमंतराम पाटील.दहिसर -मुंबई
भ्र.ध्व.-9757340310.

No comments:

Post a Comment