Saturday, 15 April 2017

शीतल जलसमाधी

शीतल जलसमाधी

किसान कन्या विशीत जलसमाधी शीतल
हुंड्याचा रिकामी हंडा बाप झाला हवालदील
पाच लाख  हुंडावळ लग्नाचा सौदा  बाजार
हुंड्याची कुठार घाली सपासप घाव तरुवर
दुष्काळी अवकळा आली कुत्राही पुसेना हाल
हुंड्याचा रिकामी हंडा बाप झाला हवालदील

बँकेचे कर्ज डोईवर मेटाकुटी किसान खिन्न
कन्यारत्न ऊजवेना हुंड्याबिगर बोहलासुन्न
बापदुःखात डुंबे कन्या निघाली देवाजीघरा
थिटी पडली पुरोगामी सुधारकी विचारधारा
रुढी प्रथा परंपरा कैक अद्यापि क्रूर जहाल
हुंड्याचा रिकामी हंडा बाप झाला हवालदील

अरे मर्दा  हुंडाजोगवा मागणे कदा बरे नव्हे
बायको पोसणे शक्यनसता लग्न करणे खरे नव्हे
फुकाफुकी लेकींचा जर वायाळ रुपे अंत होईल
परिणिता वधूविण वंशदिवा मंदावून विझेल
प्रथा रुढी अमंगल बिगरहुंडा होवो शुभमंगल
हुंड्याचा रिकामी हंडा बाप झाला हवालदील

........हेमंतराम पाटील. दहिसर -मुंबई.
भ्र.ध्व. 9757340310

No comments:

Post a Comment