Wednesday, 21 March 2018

जागतिक वनदिन

जागतिक वनदिन

वनराई माऊली आमुची पूर्ण जगतास सावली
काय वानू तिचे मोल तुळता कदापि न तुळली

वने वाढता जाय हजारो वर्षांचा लांबचा काळ
तोडताना वनराई पळाचा ना विलंब ना वेळ

वृक्षवल्ली सज्जना सोयरे कथियले संतमहंत
दुर्जन चालवून कुठारी करतात वनाचा अंत

कितीतरी जंगले करोनी नष्ट बांधले मनोरे किती
माणसानेच सजविली महा मसणवटी सर्वांभूती

पूर्वजांनी जोपासलेले वन उजाड केले वंशजाने
पुढच्या पीढीला ठेवले सिमेंटचे गगनआशियाने

करा एकवीस मार्च साजरा जागतिक वनदिन
वाढवारे स्वताःचे अपत्य म्हणून वृक्ष प्रत्येकानं

........पी. हेमंतराम कविवर.8108419392

No comments:

Post a Comment